Prof Saibaba:प्रा. साईबाबांच्या सुटकेसंदर्भातील हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Professor GN Saibaba Acquitted : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून प्राध्यापक जी. एन. साईबाबा (GN Saibaba) यांची सुटका करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला, सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) स्थगिती दिली आहे. मुंबई हायकोर्टाच्या (Bombay HC) नागपूर खंडपीठानं साईबाबा यांना निर्दोष ठरवलं होतं. त्याला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जीएन साईबाबांना सध्या तुरुंगातच राहावं लागणार आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 8 डिसेंबरनंतर होणार आहे. यापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयानं कथित माओवादी संबंध प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतरांची निर्दोष मुक्तता केली होती आणि त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते.