Supreme Court on Coaching Centers : कोचिंग क्लासेसमुळे नाही तर पालकांच्या अपेक्षांमुळे आत्महत्या

Continues below advertisement

बातमी राजस्थानच्या कोटामधील कोचिंग क्लासेसबद्दल. कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थी आत्महत्या करत नसून, पालकांच्या अव्वाच्या सव्वा अपेक्षा पूर्ण न करता आल्यामुळे आत्महत्या करतायत असं परखड मत सुप्रीम कोर्टाने मांडलं. राजस्थानातल्या कोटा शहरातल्या क्लासेसमध्ये झालेल्या आत्महत्यांनंतर याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबईचे डॉक्टर अनिरूद्ध मालपाणी यांनी ही याचिका दाखल केली होती. विद्यार्थ्यांची कोचिंग क्लासच्या नावाखाली पिळवणूक होत असल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली होती. त्यामुळे या क्लासेसवर निर्बंध लावण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram