Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांना दिलासा,  हेट स्पीच प्रकरणी याचिका फेटाळवी

Continues below advertisement

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा मिळालाय.  हेट स्पीच प्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. २००७  मध्ये सीएम योगी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने आज या प्रकरणी निकाल दिला. प्रक्षोभक भाषणाच्या आरोपाखाली मुख्यमंत्री योगी यांच्यावर खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी नाकारली. यापूर्वी मे २०१७ मध्ये राज्य सरकारने हा खटला चालवण्यास परवानगी नाकारली होती. तेव्हा सरकारने सांगितले की, खटल्यातील पुरावे अपुरे आहेत. जे २०१८ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेही कायम ठेवले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram