America : अमेरिकेतील टेक्सासमध्ये भारतीय-अमेरिकन महिलांवर वर्णद्वेषी हल्ला
अमेरिकेतील टेक्सासमध्ये भारतीय-अमेरिकन महिलांवर वर्णद्वेषी हल्ल्या झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. डाउनटाउन प्लानो येथील सिक्स्टी वाइन्स रेस्टॉरंटच्या बाहेर चार महिला भारतीय पद्धतीत बोलत होत्या. त्याचवेळी एका मेक्सिकन-अमेरिकन महिलेने त्यांच्यावर वर्णद्वेषी म्हणत शिवीगाळ केली. या महिलेने एका भारतीय महिलेला मारहाण देखील केली. ही घटना 24 ऑगस्टची असून, या महिलेला अटक करण्यात आली आहे. एका भारतीय महिलेने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आरोपी महिला भारतीय महिलांच्या ग्रुपला, 'मला भारतीयांचा तिरस्कार आहे. आमच्या देशात तुम्ही लोक तुला चांगलं आयुष्य हवं म्हणून येऊन राहता. मात्र तुमच्यामुळे हा देश उद्ध्वस्त होतोय. तुम्ही भारतात परत जा. या देशाला तुमची गरज नाही असे बोलताना दिसून येत आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE India Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News India ABP Maza MARATHI NEWS American