PMLA Hearing : पीएमएलए कायद्याचं आज भवितव्य ठरणार, अधिकार क्षेत्र निश्चित होण्याती शक्यता

Continues below advertisement

अनेक नेत्यांना तुरुंगवास घडवणाऱ्या.. आणि अनेक नेत्यांची झोप उडवणाऱ्या पीएमएलए कायद्याचं आज भवितव्य ठरणार आहे.... प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अर्थात पीएमएलए कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे... पीएमएलए कायद्यातील अनेक तरतुदी संविधानविरोधी असल्याचा दावा या याचिकांमध्ये करण्यात आलाय. पीएमएलए कायद्यानुसार पैशांच्या अफरातफरीबाबत आरोप सिद्ध झाले नाही तरी पैशांची देवाण घेवाण करण्यावरून खटला चालवता येतो मात्र या तरतूदींचा बेकायदेशीर पद्धतीनं वापर होत असल्याचा दावा करत पीएमएलए कायद्याला आव्हान देण्यात आलंय. पीएमएलए कायद्याविरोधात जवळपास 100 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. यात पीएमएलए कायद्याचं अधिकार क्षेत्र निश्चित होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram