Pegasus : पेगॅसस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समितीची स्थापना, केंद्र सरकारला ही सुनावलं

Continues below advertisement

पेगॅसस हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज मोठा निर्णय घेत निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. निवृत्त न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीत डॉ. नवीन कुमार चौधरी, डॉ. प्रभाकरन आणि डॉ. अश्विन अनिल गुमस्ते हे तांत्रिक सदस्य असतील. तर अलोक जोशी आणि संदीप ऑबेरॉय हे सायबर एक्सपर्ट असतील. सरकारला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ दिला, पण सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचं सांगत उत्तर दिलं नाही. सरकारनं आरोपांचं खंडन केलं नाही. न्यायालय मूकदर्शक बनून राहू शकत नाही, असं सांगत चौकशी समिती नियुक्त करण्याची घोषणा सरन्यायाधीशांच्या खंडपीठानं केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram