कुर्रर्र... बाळाचं नाव 'बॉर्डर'; 70 दिवसांपासून अटारी बॉर्डरवर अडकलेल्या जोडप्याकडून बाळाचं नामकरण

Continues below advertisement

आम्ही सन्नी देओलच्या सिनेमाबद्दल नव्हे तर एका बाळाबद्दल बोलतोय.. होय.. बॉर्डर हे एका बाळाचं नाव आहे...जेवढं हे नाव इंट्रेस्टिंग आहे, तेवढीच त्यामागची कहाणी. अटारी सीमेवर ७० दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या जोडप्यानं २ डिसेंबरला एका बाळाला जन्म दिला... आणि आई-वडिलांनी त्याचं नाव बॉर्डर ठेवलं. पंजाब प्रांतातील राजनपूर जिल्ह्यात राहणारे बलम राम आणि निंबू बाई हे जोडपं तीर्थ यात्रेसाठी भारतात आलं होतं. मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी ते पाकिस्तानात परतू शकलं नाही. गेल्या ७० दिवसांपासून ते ९७ नागरिकांसह अटारी सीमेवरच राहताहेत. अशातच निंबू बाई यांनी बाळाला जन्म दिला. सीमेवर जन्म झाल्यानं बाळाचं नाव बॉर्डर ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला... आणि हेच नाव आता सध्या चर्चेचं विषय ठरतंय. 

भारत-पाक सीमेवर बाळाचा जन्म; नावं ठेवलं बॉर्डर

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram