West Bengal : कोलकाता CBI कार्यालयावर दगडफेक, ममता सरकारचे दोन मंत्री आणि आमदाराला CBIची अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2021 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकाता : सोमवारी नारदा स्टिंग प्रकरणात त्यांच्या दोन मंत्र्यांसह पक्षाच्या चार नेत्यांना अटक झाल्यानंतर निझाम पॅलेस सीबीआय कार्यालयात पोहचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुमारे सहा तासांनंतर बाहेर आल्या. सीबीआय कार्यालयातून बाहेर पडताना ममता म्हणाल्या- कोर्ट त्यावर निर्णय घेईल. सीबीआयने टीएमसी सरकारचे दोन मंत्री सुब्रत मुखर्जी आणि फिरहाद हकीम यांच्यासह आमदार मदन मित्रा आणि कोलकाताचे माजी महापौर शोवन चटर्जी यांना अटक केली आहे.