Corona Vaccine : भारतात Sputnik V लसीला परवानगी, डॉ. रेड्डीज करणार लसीचं उत्पादन #Russia
Continues below advertisement
Sputnik V : संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. अशातच अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच जगभरात कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. भारतातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी सध्या दिल्या जात आहेत. यात आता भारतीय औषध नियामकांकडून रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे.
Continues below advertisement