पंतप्रधानच Maratha Reservation चा प्रश्न सोडवू शकतील : खासदार हेमंत पाटील
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
08 Jun 2021 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. आज सकाळी ही भेट होणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन विशेष अधिवेशन बोलवावं, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेत असल्याचं शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितलं.