Special Report | एक मुंबईचा, एक दिल्लीचा, चार यूपीचे! दाऊदने का निवडले हेच सहा चेहरे?
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. असी धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच घातपाताचा कट यशस्वी करण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाची ठिकाणंही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा कट यशस्वी करण्यासाठी अनेक ठिकाणी विस्फोटकं पोहोचवण्यात आली आहेत, असं दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.
Tags :
PAKISTAN Mumbai Police Dawood Ibrahim Isi Delhi Police Pakistan Army Maharashtra ATS UP ATS Terrorist Arrested