Special Report | दहशतवादाचे हात, ट्रेनिंगचा पत्ता पाकिस्तान; आधी मस्कत, नंतर पाकिस्तान, टार्गेट हिंदुस्तान

दाऊद इब्राहिम म्हणजे मुंबईचा जुना शत्रू. याच दाऊदनं मुंबईवर वक्रदृष्टी टाकल्यनं आता तपास यंत्रणांची झोप उडाली आहे. मुंबई आणि दिल्लीत घातपाताचा कट आखणाऱ्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी एका दहशतवाद्याचं मुंबईतील सायन परिसरात वास्तव्य होतं, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जान मोहम्मद अली शेख, असं अटक करण्यात आलेल्या मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे. महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथकानं काल जान मोहम्मदच्या घरी जाऊन तपास सुरु केला आहे. तसेच त्याच्यासोबत राहत असलेल्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola