Special Report | केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक, आंदोलनावरुन राजकारण सुरू
संविधान दिनाता मुहूर्त साधत आज( 26 नोव्हेंबर) हरियाणा, पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषीनीतीविरोधात चलो दिल्ली आंदोलन तीव्र केलं आहे. त्यामुळे दिल्लीच्या सर्व सीमांना आज लष्करी छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे मारले जात होते. कुठे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जाता होत्या तर कुठे सीमेवर असावा तसा कडेकोट पहारा होता. ही सगळी तयारी कुठल्या अतिरेक्यांसाठी नाही तर ही शेतकऱ्यांचं आंदोलन रोखण्याची तयारी होती.