Special Report | सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र, 11 हजार ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय, सोनियांचा आरोप
मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशात केंद्रीय कोट्यातल्या आरक्षणावरुन नवा वाद सुरु झाला आहे. या कोट्यात एससी वर्गाला 15 टक्के, एसटी 7.5 टक्के तर आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण मिळत आहे. मात्र ओबीसींना यात काही ठिकाणी डावललं जात असल्याचा आरोप आहे. आता थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.