Special Report | रस्त्यावरचा ढाबा ते चकाचक रेस्टॉरंट, व्हायरल झालेल्या 'बाबा का ढाबा' चं पालटलं रूप

सोशल मीडिया काय कमाल करु शकतो याचं उदाहरण म्हणजे दिल्लीतल्या बाबा का ढाबाची कहाणी. अवघ्या काही महिन्यात या बाबांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. दिल्लीतल्या कांता प्रसाद यांचा चेहरा आता देशात सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'बाबा का ढाबा' चे ते मालक आहे. याच सोशल मीडियानं त्यांच्या आयुष्यात प्रचंड बदल घडवून आणला आहे. काल परवापर्यंत एका टपरीचे चालक असलेल्या बाबांनी आता दिल्लीत स्वता:चं एक रेस्टॉरंट सुरु केलं आहे. अर्थात 'बाबा का ढाबा' हे नाव मात्र कायम आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola