Special Report | राष्ट्रवादीची शिवसेनेला साथ, कॉंग्रेसला धक्का?
महाविकास आघाडीतील काही नेते ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना वेगळ्या सूचना दिल्या आहेत. आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे, त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या, असे आदेश राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
Tags :
Mahavikas Aghadi Special Report Maharashtra Government Ajit Pawar Shivsena CM Uddhav Thackeray