Amarinder Singh | पंजाबमध्ये कॉंग्रेससमोर अमरिंदर यांचं आव्हान
नवज्योत सिद्धूमुळे मुख्यमंत्रीपद आणि काँग्रेस पक्ष सोडावा लागलेल्या कॅप्टन अमरिंदर यांनी आता नवी चूल मांडण्याचं ठरवलंय. अमरिंदर यांनी पंजाबच्या भविष्यासाठी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलीय. तसंच भाजपसोबत जाण्याचं सूतोवाचही केलंय. पक्षाचं नाव त्यांनी अजून जाहीर केलेलं नाही. पण त्यांच्या या पवित्र्यामुळे काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा फटका बसणार यात शंका नाही. पाहूयात पंजाबमधील काँग्रेसमधील संघर्षाच्या नव्या नांदीची झलक या स्पेशल रिपोर्टमधून.