Sonia Gandhi ED Summons : सोनिया गांधी यांना आज ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश ABP Majha

 कोरोनासंसर्गामुळे ईडी चौकशीला हजर राहू न शकलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावले आहेत. आज सकाळी सोनिया गांधींना चौकशीला हजर राहण्याचे समन्स आहेत.. कोरोनातून नुकत्याच बऱ्या झालेल्या सोनिया गांधी या चौकशीला आज हजर राहणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता त्या ईडी ऑफिसला जाण्यासाठी निघणार आहेत. मात्र सोनिया गांधींना आलेल्या या समन्समुळे काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झालेय. या समन्सविरोधात राज्यभर आज काँग्रेसचं आंदोलन आहे... मुंबईतही आज काँग्रेस नेते ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. सकाळी ११ वाजता जीपीओ चौकातून हा मोर्चा निघेल... नाशिक आणि पुण्यातही काँग्रेसची निदर्शनं आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola