Skyroot Aerospace Rocket : श्रीहरीकोटाहून आज पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण, स्कायरुट एरोस्पेस
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आज आणखी एक इतिहास रचला आहे... श्रीहरीकोटामधून आज ईस्रोनं पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण केलंय विक्रम-सबऑरबिटल रॉकेट असं या रॉकेटचं नाव आहे. स्काईरूट एयरोस्पेस प्राइवेट लिमिटेड या खासगी कंपनीनं या रॉकेटची निर्मिती केलेय. 550 किमी वजनाचं हे ((सिंगल स्टेज स्पिन स्टेबलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट)) रॉकेट आहे. अगदी काही वेळापूर्वीच त्यानं अंतराळात झेप घेतली. आज उड्डाण केल्यानंतर हे रॉकेट १०० किलोमीटरपर्यंत झेप घेईल आणि त्यानंतर समुद्रात कोसळेल. केंद्रीय अंतराळ मंत्री डॉ जितेंद्र सिंह या प्रक्षेपणावेळी उपस्थित होेते
Tags :
Launch Sriharikota Indian Space Research Organization ISRON A History Private Rocket Vikram-Suborbital Rocket 550 Km Weight Single Stage Spin Stabilized Solid Propellant