SIM Card NEWS : तुमच्या नावावर किती सिम कार्ड? 30 सेकेंदात कळणार ABP Majha
Continues below advertisement
तुमच्या नावावर किती सीम कार्ड आहेत?, तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी सिमकार्ड घेतलेलं नाही ना? याचं उत्तर आता तुम्हाला केवळ ३० सेकंदात कळणार आहे. सरकारच्या नव्या पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या सिमकार्डची माहिती तात्काळ मिळणार आहे. tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर ही माहिती आपल्याला मिळू शकेल. तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी सिमकार्ड घेतलं आणि त्याचा गैरवापर केला तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे या पोर्टलचा वापर करून तुमच्या नावावर कुणी सिमकार्ड वापरत नाही ना हे तपासता येणार आहे.
Continues below advertisement