Sharad Pawar :साहेब,टेम्पो हळू चालवा,डोकं छताला आपटतंय, शरद पवारांचा टेम्पो चालवण्याचा किस्सा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. आता एक नवीन भन्नाट किस्सा समोर आला आहे. हा किस्सा सांगितलाय पत्रकार सुधीर भोंगळे यांनी. प्रसंग होता शरद पवारांवर भोंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहाचा. अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं 'नेमकचि बोलणें' या पुस्तकाचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना भोंगळे यांनी पवारांच्या 'ड्रायव्हिंग स्किल'चा एक किस्सा सांगितला.
Tags :
पत्रकार Journalist यांचे सुधीर भोंगळे President Sharad Pawars Sudhir Bhongale Economist Driving Skill