Citizenship Amendment Bill | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवेसना विरोध करणार | ABP Majha

Continues below advertisement
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवेसना विरोध करणार आहे. संसदेत शिवसेना या विधेयकाविरोधात मतदान करणार आहे. या विधेयकाला मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यानंतर हे विधेयक उद्या लोकसभेत विधेयक मंजुरीसाठी पटलावर मांडलं जाणार आहे. लोकसभेत बहुमत असल्याने तिथे हे विधेयक मंजूर करून घेण्यात सरकारला अडचण येणार नाही. मात्र सरकारची खरी कसोटी राज्यसभेत असेल. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारला १२० खासदारांच्या मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेत सध्या २३९ सदस्य आहे. यांत भाजपचे ८१ सदस्य आहेत. त्यामुळे भाजपला राज्यसभेत आणखी ३९ मतांची गरज लागेल. जेडीयूने या विधेयकाला सुरूवातीपासूनच विरोध केलाय. त्यामुळे जेडीयूचे सहा खासदार राज्यसभेत विधेयकाला विरोध करतील. महाराष्ट्रातील नव्या समीकरणांनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही या विधेयकाला विरोध करतील. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram