Hussain Dalwai | दाभोलकरांच्या हत्येचा आरोप असलेल्या 'सनातन'वर बंदी घाला : हुसेन दलवाई | ABP Majha

Continues below advertisement

ज्या सनातन संस्थांवर डॉ. नरेद्र दाभोलकरांच्या हत्येचे आरोप आहेत त्या संस्थांवर सरकारनं ताबडतोब बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. तसेच संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही दलवाई यांनी सरकारकडे केली आहे. दलवाई यांनी बोलताना सांगितले की, 'आरे आणि नाणार या दोन्ही प्रश्नांबाबतच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत, याचा मला खरचं फार आनंद आहे. नाणार आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो, तसेच मी तिथे सत्याग्रही केला होता. आमच्या पक्षानेही या आंदोलनात अनेक भूमिका घेतल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही निर्णयांचं मी स्वागत करतो. तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणासंबंधी ताबडतोब चौकशी करावी. संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्या बाबतीत सरकारने ताबडतोब भूमिका घेणे आवश्यक आहे. भीमा-कोरेगाव मध्ये या दोन्ही व्यक्तींचा थेट सहभाग होता. परंतु ते विशिष्ट विचारांचे असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने यासंदर्भात कडक भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे.'

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram