Shiv Sena Sudhir Suri shot at in Punjab Amritsar : शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShiv Sena : अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीनं दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये सुधीर सुरी गंभीर जखमी झाले आहेत. जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पंजाबमधील अमृतसर येथे शुक्रवारी ते गोपाळ मंदिर परिसरात कचऱ्यात देवाची मुर्ती आढळल्यामुळे निदर्शने करत होते. त्यावेळी गर्दीमधील एका व्यक्तीनं सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी गोळी झाडणाऱ्याला अटक केली असून आरोपीनं कबुली दिली आहे.
पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर अमृतसरमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सुधीर सुरी हे अमृतसरमध्ये एका मंदिराच्या बाहेर निदर्शने करत होते. त्यावेळी जमलेल्या गर्दीतून पुढे आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर गोपाळ मंदिरासमोर असलेल्या घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं सांगितलं जातंय. पंजाबमधील आणखी एक शिवसेना नेते अश्वनी चोप्रा यांच्यावरही गुरुवारी प्राणघातक हल्ला झाला होता. अश्वनी चोप्रा यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर सायकलवरुन आल्याचं सांगण्यात आलं होतं.