Sanjay Raut | 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा 'जय हिंद, वंदे मातरम' एवढीच महत्त्वाची : संजय राऊत

Continues below advertisement
 "जय भवानी, जय शिवाजी" ही घोषणा नियमभंग करणारी, घटनाबाह्य नाही. तर ती जय हिंद आणि वंदे मातरम एवढीच महत्त्वाची आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, उद्या जय हिंद, वंदे मातरमवर आक्षेप घ्याल का? जय भवानी, जय शिवाजी ही महाराष्ट्राची घोषणा आहे. हा महाराष्ट्राचा मंत्र आहे.  शत्रूविरुद्ध लढताना चेतना जागविण्यासाठी सीमेवर भारतीय सैनिकही 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा देतात, असं राऊत म्हणाले. यापूर्वी सभागृहात शपथ घेताना "अल्ला हो अकबर"च्याही घोषणा दिल्या गेल्या आहेत. व्यंकय्या नायडू नियमानुसार बरोबर वागले असतील. तरी जनभावनांचा अवमान झाला आहे, असं राऊत म्हणाले. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं घोषणा दिल्या आहेत. हा वाद वाढू नये, नायडू हे वरिष्ठ आहेत, असं देखील राऊत म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram