Pune Lockdown | लॉकडाऊनने काय साधलं? पुणेकरांचा प्रशासनाला सवाल
पुणे, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसरात दहा दिवसांसाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा आजचा शेवटचा दिवस आहे. या काळात पुण्यातील रुग्ण संख्या आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही आतापर्यंतची सर्वात जास्त आहे. पुण्यात काल दिवसभरात 3 हजार 218 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची एकाच दिवसातली सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे या लॉकडाऊनचा काय उपयोग झाला असा प्रश्न विचारला जात आहे .