
Air India Case : प्रवासी महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला अटक, क्रू मेंबरसह पायलटलाही नोटीस
Continues below advertisement
एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला अखेर अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांकडून बंगळुरुमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. शंकर मिश्रा कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या एका अमेरिकन कंपनीचा उपाध्यक्ष आहे. दरम्यान, संबंधित महिलेने पैसे उकळण्यासाठी आणि ब्लॅकमेलिंग करण्यासाठी ही तक्रार केल्याचा आरोप शंकर मिश्राचे वडील श्याम मिश्रा यांनी केलाय.
Continues below advertisement