पतीनं पत्नीवर केलेली बळजबरी बलात्कार नाही; Chhattisgarh उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Continues below advertisement
पत्नीसोबत पतीनं बळजबरीनं ठेवलेले शारीरिक संबंध म्हणजे, बलात्कार नाही, असा निर्णय छत्तीसगढ उच्च न्यायालयानं दिला आहे. या याचिकाकर्त्या पिडीत महिलेनं आपल्या पतीनं आपल्या इच्छेविरोधात लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रार करत बलात्काराचा आरोप केला होता. न्यायालयानं यावर सुनावणी करताना आरोपी पतीला निर्दोष मुक्त केलं आहे. मात्र छत्तीसगढ उच्च न्यायालयाच्या या निर्णयाची कायद्याच्या वर्तुळात चर्चा सुरु आहे.
Continues below advertisement