Delhi : भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा, GST इनपुट क्रेडिटच्या माध्यमातून फसवणूक

Continues below advertisement

सरकारला जवळपास दोनशे कोटींचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील एका भंगार विक्रेत्याला जीएसटी विभागानं औरंगाबादमध्ये अटक केलीय. समीर मलिक असं भंगार विक्रेत्याचं नाव आहे. भंगार विक्रीचा कोणताही व्यवहार न करता बनावट बिले तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून सरकारला जवळपास दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त गंडा या व्यापाराने घातल्याची अंदाज आहे. या घोटाळ्यात सहभागी झालेल्या औरंगाबादमधील वाळूज, हनुमान नगर येथील एका भंगार दुकानावरही धाड टाकण्यात आलीय. त्यातून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. औरंगाबादमधील 15 व्यावसायिकांशी त्यानं बनावट बिलांच्या आधारे व्यवहार केला होता. त्यांना दहा कोटी रुपयांची रक्कम त्यानं पाठवली होती. या व्यवहारात गडबड आढळल्यानं जीएटी अधिकाऱ्यांनी त्याला औरंगाबादमध्ये बोलावून अटक केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram