Sanjay Raut Full PC : रामलल्लाचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही - संजय राऊत
Sanjay Raut Full PC : रामलल्लाचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही - संजय राऊत देशात बेरोजगारी (Unemployment) वाढल्याने तरुणांनी संसदेत घुसखोरी केलयाचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. रामलल्लांचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, असा घणाघात संजय राऊतांनी सरकारवर केला. राज्य सरकार भांडवलदार, उद्योगपतींची दलाली करत आहे. दरम्यान, धारावी मोर्चाची चेष्टा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपवर संजय राऊतांनी सडकून टीका केली.