Indian Railway News : पुढील सात दिवस रेल्वे आरक्षण सुविधा बंद राहणार, जाणून घ्या पुर्ण माहिती...
Continues below advertisement
पुढील सात दिवस दररोज सहा तास रेल्वे आरक्षण सुविधा बंद राहणार आहे. तिकीट यंत्रणा कोरोना पूर्वीप्रमाणे करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. 21 नोव्हेंबरपर्यंत रात्री साडेअकरा ते सकाळी साडेपाच वाजेपर्यंत रेल्वे आरक्षण सुविधा बंद असेल. आरक्षित तिकीट, चालू तिकीट, तिकीट रद्द करणे अशा विविध सेवा या काळात बंद राहतील. तब्बल 20 महिन्यांनंतर भारतीय रेल्वे पुन्हा एकदा पूर्वपदावर येतेय. कोरोना काळात घेतलेले नियम रेल्वेकडून रद्द केलेत. रेल्वेने तिकीट दरही पूर्वीप्रमाणे केेलेत. .
Continues below advertisement