Toll Plaza : वाहनांवरील फास्टॅग हटवण्याची संसदीय समितीची शिफारस, टोलवसुलीसाठी जीपीएस यंत्रणेचा विचार
Continues below advertisement
टोल नाक्यावरच्या वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं फास्टॅग आणला.. मात्र आता फास्टॅगही इतिहासजमा करण्याची तयारी केंद्र सरकारनं सुरु केल्याचं कळतंय. फास्टॅगऐवजी जीपीएस यंत्रणेच्या मदतीनं थेट बँक अकाऊंटमधून टोलचे पैसे वसूल करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. परिवहन आणि पर्यटनसंदर्भातल्या संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष टी जी व्यंकटेश यांनी बुधवारी संसदेत एक रिपोर्ट सादर केला आहे.संसदीय समितीनं फास्टॅग हटवण्याची शिफारस केली आहे. फास्टॅगचं ऑनलाईन रिचार्ज करताना अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो, मात्र जीपीएस यंत्रणा कार्यन्वित झाल्यानंतर या समस्येतून वाहनधारकांची कायमची सुटका होईल... तसंच टोल नाका उभारण्यासाठी लागणारा खर्च देखील वाचेल अशी संसदीय समितीची शिफारस आहे..
Continues below advertisement