Reena Dwivedi : उत्तर प्रदेशमधील 'ती' महिला अधिकारी नव्या लुकमुळे पुन्हा चर्चेत

2019 च्या उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत एका पिवळ्या साडीतील महिलेची देशभरात चर्चा होती. सरकारी कर्मचारी असलेली, पिवळी साडी नेसलेली आणि डोळ्यावर गॉगल असलेली ही महिला हातात मतदानपेटी घेऊन मतदान केंद्रावर जाताना दिसली होती. तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. रीना द्विवेदी नावाची ही महिला यंदा पुन्हा चर्चेत आलीय. पण यावेळी तिचा लुक बदललेला दिसतोय. रीना द्विवेदींचा यंदाच्या निवडणुकांदरम्यानचा फोटोही व्हायरल होतोय. रिना ह्या यूपी सरकारमधील पीडब्ल्यूडी विभागात क्लार्क म्हणून काम करतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola