Belgaum Municipal Corporation Election: बेळगाव मनपा निवडणूक पुन्हा घ्या,40हून अधिक उमेदवारांची मागणी

Continues below advertisement
महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पारदर्शी झाली नसल्याचा आरोप चाळीस हून अधिक उमेदवारांनी केला असून निवडणूक प्रक्रिया रद्द करून व्ही व्ही पॅटचा वापर करून पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारी रात्री चाळीसहून अधिक उमेदवारांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.महानगरपालिका निवडणुकीत केवळ मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. व्ही व्ही पॅटचा वापर  केला गेला नाही.मतदान यंत्राला  व्ही व्हीं पॅट मशीन जोडणे आवश्यक आहे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये दिला होता.पण महानगरपालिका निवडणुकीत या आदेशाचे पालन केले गेले नाही.त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शी झाली नसल्याचा आरोप उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.सर्वोच्च  न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्याने  सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून फेर निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram