Ranbir Kapoor, Alia Bhatt : Ujjain महाकालचं दर्शन घेण्यास आलिया रणबीरला विरोध ABP Majha

आलिया भट आणि रणबीर कपूर तसंच ब्रह्मास्त्र सिनेमाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी हे महाकालच्या दर्शनासाठी काल उज्जैनमध्ये दाखल झाले खरे... मात्र हिंदू संघटनांच्या विरोधामुळे त्यांना दर्शन न घेताच माघारी परतावं लागलंय.. आलिया आणि रणबीर दर्शनसाठी येणार असल्याचं समजताच बजरंग दल आणि इतर स्थानिक हिंदुत्तवादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं. त्यानंतर आलिया, रणबीर आणि आयन हे उज्जैनचे जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यावर पोहोचले. ब्रह्मास्त्र सिनेमातील काही दृश्यांवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे....तसंच रणबीर यांनी गोमांस खात असल्याची कबुली दिलीय.. त्यामुळे आलिया आणि रणबीरला महाकाल मंदिरात प्रवेश देण्यास हिंदुत्ववादी संघटनांचा नकार आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola