Ram Mandir Threat : राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची धमकी

Continues below advertisement

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Temple) दहशतवादी संघटनेच्या (Terrorist) निशाण्यावर असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ माजली आहे. दहशतवाद्यांच्या धमकीमुळे अयोध्या प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammed) दहशतवादी संघटनेने अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटनेची धमकी

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्यानंतर अयोध्या अलर्ट मोडवर आलं आहे. राम मंदिरासह महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरकेतषा वाढव करण्यात आली आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळाचीही सुरक्षा वाढवण्यात आली, एसएसपी राज करण नय्यर यांनी महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी अयोध्या राम मंदिरातील सुरक्षेचाही आढावा घेतला. दहशतवादी संघटनेने दिलेल्या धमकीवर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram