राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा करणार : हनुमान गढीचे महंत राजू दास

Continues below advertisement

अयोध्या : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी रुपये दराची जमीन 18 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. त्यांनी सांगितलं की, हे थेट पैशांच्या अफरातफरीचं प्रकरण आहे आणि सरकारने याची सीबीआय आणि ईडीमार्फत तपास करावा.

तर दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि अयोध्याचे माजी आमदार पवन पांडे यांनीही चंपत राय यांच्यावर असेच आरोप करत सीबीआय तपास करण्याची मागणी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram