Ram Mandir Ayodhya : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सचिन- विराट ते अंबानी... 7000 जणांना आमंत्रण
Ram Mandir Ayodhya : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सचिन- विराट ते अंबानी... 7000 जणांना आमंत्रण श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, फिल्म स्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह जवळपास सात हजार जणांना, राम मंदिरात राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. ट्रस्टच्या सूत्रांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. याशिवाय, दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'रामायण' मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 जानेवारी, 2024 रोजी होणाऱ्या या प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी आधीच आमंत्रण देण्यात आले आहे. ट्रस्टने 3000 व्हीव्हीआयपींसह 7,000 जणांना आनंत्रण पाठवले आहे. या कार्यक्रमासाठी 1992 मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत, योग गुरु राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपति गौतम अधाणी यांचा समावेश आहे.