Ram Mandir : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा, राममंदिर सोहळ्याचं आमंत्रण कुणाला ?

Continues below advertisement

Ram Mandir :  राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा , राममंदिर सोहळ्याचं आमंत्रण कुणाला ? 

अयोध्या : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे. त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळतयं. त्यातच राजकीय वर्तुळात देखील राम मंदिराच्या उद्घाटनावरुन सध्या राजकारण चांगलच तापलंय. पण अनेकांना उत्सुकता असलेलं हे राम मंदिर नक्की आहे तरी कसं किंवा त्याची वैशिष्ट्ये नेमकी कशी आहेत, याची उत्सुकता सध्या सर्वांना लागून राहिलीये. 

येत्या 17 जानेवारी पासून अयोध्येत रामलल्लाच्या  प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसेच 22 जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. बालअवस्थेतील असलेल्या श्री रामलल्लाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जाणार आहेत. यासाठी जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकातील दोन ठिकाणहून कृष्णशीला निवडण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram