Rakesh Tikait: सपाला पाठिंबा देण्यापासून राकेश टिकैत यांचा यू- टर्न ABP Majha

Continues below advertisement

भारतीय शेतकरी यूनियनचे नेते नरेश टिकैत यांनी दोन दिवसांपूर्वीच्या वक्तव्यावर आज यू टर्न घेतलाय. काल सपाला पाठिंबा देणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर आज त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला आम्ही समर्थन देत नाही असं म्हटलंय. विशेष म्हणजे आज भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री संजीव बलियान यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी नवे वक्तव्य केलेय. एक उमेदवार आशीर्वाद मागण्यासाठी आला होता त्याला फक्त आशीर्वाद दिला. जो कोणी आमच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी येईल त्याला आम्ही तसंच परत पाठवू शकत नाही. असंही टिकैत यांनी म्हटलंय. यूपीला सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता असल्यानं मुख्‍यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधून अवश्य जिंकाव असंही यावेळी टिकैत म्हणालेत. नरेश यांचे बंधू राकेश टिकैत यांनी यापूर्वीच कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram