Rajya sabha election | राज्यसभेतील सात जागांवर महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी? | ABP Majha
राज्यसभेत भाजपच्या तीन जागा हमखास निवडून येणार आहेत. यातील दोन जागांवर उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची नावं पक्की झाल्याचं कळतंय. तर तीसऱ्या जागेसाठी हंसराज अहिर, किरीट सोमय्या आणि विजया रहाटकर यांची नावं चर्चेत आहेत. तर, राज्यसभेसाठी काँग्रेसमध्येही जोरदार लॉबिंग सुरु आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या जागेवर मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील आणि राजीव सातव यांची नावं चर्चेत असल्याचं कळतंय.