Rahul Gandhi Corona Positive : राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह, सौम्य लक्षणं असल्याची ट्वीट करुन दिली माहिती
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, सौम्य लक्षणं दिसल्यानंतर माझी कोरोना टेस्ट झाली, माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना नियमांचे पालन करा आणि सुरक्षित राहा.