लसीची एवढी निर्यात नजरचुकीनं झाली का? लसीकरण मोहिमेवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांना खोचक टोला

Continues below advertisement

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज मोठी भर पडत असताना दुसरीकडे कोरोनाच्या लसीचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देशात कोरोनाच्या लसीचा तुटवडा होणं ही गंभीर समस्या असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले की, "देशात कोरोनाचे संकट असताना लसीचा तुटवडा हा काही उत्सव नसून ती गंभीर समस्या आहे. आपल्या देशवासियांचे प्राण संकटात टाकून कोरोना लस निर्यात करणे योग्य आहे का? केंद्र सरकारने सर्वच राज्यांना कोणताही भेदभाव न करता मदत केली पाहिजे. आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन या महामारीवर मात करावं लागेल. "

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram