Mohali case : मोहालीत 8 विद्यार्थिंनी जीवन संपवण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल केल्याने टोकाचं पाऊल
पंजाबच्या मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीच्या ६० विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. चंदीगड विद्यापीठात संतप्त विद्यार्थ्यांनी काल रात्री आंदोलन केलं. या प्रकारानंतर आठ विद्यार्थिनींनी एकाच वेळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत होतं. पण ती अफवा असल्याचं महिला आयोग आणि पोलिसांनी स्पष्ट केलंय. याच विद्यापीठातील एका विद्यार्थिनीनं ६० विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हीडिओ शिमल्यात राहणाऱ्या एका मित्राला पाठवला. हा व्हीडिओ बनवणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.