Kargil Marathon : दोन वर्षांच्या ब्रेकनंतर कारगिल मॅरेथॉन, मराठमोळ्या संजय नहार यांचा उपक्रम
दोन वर्षांच्या ब्रेकनंतर कारगिलमध्ये मोठ्या उत्साहात मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. कारगिल शहर ते कारगिल युद्धाच्या वीरभूमीपर्यंत या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. संजय नहार यांच्या सरहद संघटनेच्या वतीने या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येतं. लडाख परिसरातील तरुणांच्या अंगभूत क्षमतांना वाव मिळावा यासाठी सरहद संघटना गेल्या २४ वर्षांपासून काम करतेय. सरहद संस्थेची कारगिल मॅरेथॉन हा लोकप्रिय उपक्रम आहे. मात्र कलम 370 हटवल्यानंतरचा कर्फ्यू आणि कोविड स्थितीमुळे गेल्या २ वर्षांपासून या मॅरेथॉन आयोजनात खंड पडला होता..