Gati Shakti Yojana : 'पंतप्रधान गतीशक्ती योजने'चा आज शुभारंभ; 16 मंत्रालयांची मोट बांधणार
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आर्थिक क्षेत्रांसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रधानमंत्री गति शक्ति राष्ट्रीय मास्टर योजनेची (Gati Shakti scheme) सुरुवात करणार आहेत. हा प्लान रेलवे, रस्त्यांसह अन्य 16 मंत्रालयांना जोडणारा एक डिजिटल मंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी संबोधित करताना या योजनेबाबत घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, गती शक्ति योजना लवकरच लॉन्च केली जाणार आहे. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी योजना असेल. यात लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. ही योजना देशाचा मास्टर प्लान बनेल जो इंफ्रास्ट्रक्चरचा पाया असेल, असंही मोदी यांनी म्हटलं होतं.
Continues below advertisement
Tags :
PM Modi PM Narendra Modi Narendra Modi Prime Minister Development Gati Shakti Scheme Gati Shakti