Presidential Election 2022 :राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता,महाराष्ट्रातून किती मतं फुटली?
Continues below advertisement
देशाचे १६ वे राष्ट्रपती कोण याचा फैसला आज होणार आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत असलेल्या या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. यशवंत सिन्हा यांना किती मिळणार आणि विरोधकांची किती मतं फुटली हे या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. १८ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत ८८०० आमदार आणि खासदारांनी मतदान केलं. आज संसद भवनात ही मतमोजणी होणार आहे. सकाळी ११ वाजता मतमोजणी सुरु होणार असून संध्याकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Yashwant Sinha Presidential Election 2022 Droupadi Murmu Presidential Election Result 2022 Presidential Election Result 2022 LIVE India Presidential Election Result 2022 India New President