President Of Bharat:आंतरराष्ट्रीय मंचावर इंडिया ऐवजी भारत नाव वापरण्यास केंद्र सरकारनं केली सुरूवात
Continues below advertisement
President Of Bharat:आंतरराष्ट्रीय मंचावर इंडिया ऐवजी भारत नाव वापरण्यास केंद्र सरकारनं केली सुरूवात. आंतरराष्ट्रीय मंचावर इंडिया ऐवजी भारत हे नाव वापरण्यास केंद्र सरकारनं सुरूवात केली आहे, असंच म्हटलं पाहिजे. कारण राष्ट्रपती भवनाकडून प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. जी ट्वेंटी बैठकीसाठी दिलेल्या आमंत्रणात 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख आहे. महत्त्वाचं म्हणजे घटनेमध्ये भारत आणि इंडिया या दोन्ही नावांचा उल्लेख आहे. त्यामुळे भारत हे नाव जी-२०च्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिण्यास गैर काहीच नाही. तरीही, कदाचित अचानक बदल केल्यानं काही विरोधक यावर टीका करतायेत.
Continues below advertisement