Pravin Togadia : जात ही भारताची वास्तविकता, तिला घाबरण्याची गरज नाही : प्रवीण तोगडिया ABP Majha
जाता जात नाही अशी 'जात' असते, असं म्हटलं जातं. त्यावर जात ही भारताची वास्तविकता असून तिला घाबरण्याची गरज नाही असं मत विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडियांनी मांडलंय. जात ही नेहमीच भांडणं लावत नाही तर ती धर्माचं रक्षणही करते असंही तोगडिया म्हणालेत. ते गोंदियात बोलत होते.