Portugal Heat Wave : पोर्तुगालमध्ये उष्णतेची लाट, 14 हजार नागरिकांचं स्थलांतर, 359 जणांचा बळी
आशियाई देशांमध्ये पावसानं थैमान घातलं असतानाच तिकडे युरोपात मात्र उष्णतेची लाट आलीये. या उष्णतेच्या लाटेचा पोर्तुगालला मोठा फटका बसलाय. पोतुर्गालमध्ये गेल्या ७ दिवसात उष्माघातामुळे ६५९ जणांचा बळी गेलाय. तेथील आरोग्य विभागानं ही माहिती दिलीये. ऐरवी पोतुगालमध्ये सरासरी तापमान १३ अंश ते २५ अंश सेेल्सिअस असतं. मात्र, गेल्य़ा काही दिवासांपासून तेथील पारा ४७ अंशांवर पोहोचलाय. यामुळे २४ हजार हेक्टरवरील जंगलांमध्ये वणवे लागले आहेत. तर १४ हजार नागरिकांंचं स्थालांतर करण्यात आलंय.